केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात ४१ हजार महिला

भरतीची मुद्रित व इलेक्ट्रॉनिक्स माध्यमात मोठ्या प्रमाणात जाहिरात देखील करण्यात आली आहे.
केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात ४१ हजार महिला
Published on

नवी दिल्ली : देशातील सीआरपीएफ, बीएसएफ आणि सीआयएसएफ यांसारख्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये एकूण ४१६०६ महिला सेवा देत असल्याची माहिती मंगळवारी लोकसभेत देण्यात आली. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी ही माहिती देतानाच केंद्रीय सशस्त्र दलांमध्ये महिलांचे प्रमाण वाढवण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्याचीही माहिती दिली.

लोकसभेत एक प्रश्नाला लेखी उत्तर देताना गृहराज्यमंत्री म्हणाले की, केंद्रीय सशस्त्र दल व आसाम रायफल्स यात मिळून सध्या एकूण ४१६०६ महिला सेवा देत आहेत. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात समावेश होणाऱ्या सेंट्रल आर्म्ड फोर्सेस, बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेस, सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्सेस, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स, इंडो तिबेटन बॉर्डर फोर, सशस्त्र सीमा बल, नॅशनल सिक्युरिटी गार्ड आणि आसाम रायफल्स यात मिळून एकूण १० लाख सुरक्षा जवान सध्या कार्यरत आहेत. सध्या भरती प्रक्रिया सुरू आहे.

भरतीची मुद्रित व इलेक्ट्रॉनिक्स माध्यमात मोठ्या प्रमाणात जाहिरात देखील करण्यात आली आहे. तसेच महिला उमेदवारांसाठी अर्जशुल्क माफ करण्यात आले आहे. तसेच महिलांसाठी शारीरिक चाचणी व शारीरिक क्षमता चाचण्यांचे निकष शिथिल देखील करण्यात आल्याची माहिती मंत्र्यांनी दिली आहे. महिला पोलिसांना प्रसूती रजा, शिशुपालन रजा यांसारख्या रजा सरकारी नियमांनुसार उपलब्ध आहेत.

logo
marathi.freepressjournal.in