उज्ज्वला योजनेच्या ४.१३ कोटी लाभार्थ्यांनी एकदाही एलपीजी सिलिंडर भरला नाही

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात याबाबत माहिती दिली
 उज्ज्वला योजनेच्या ४.१३ कोटी लाभार्थ्यांनी  एकदाही एलपीजी सिलिंडर भरला नाही

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या तारखेला कमर्शियल गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात करण्यात आली; पण घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती जैसे थे आहेत. सरकारने केवळ प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सबसिडी ठेवली आहे. इतर एलपीजी ग्राहकांसाठी सबसिडी रद्द करण्यात आली आहे; परंतु सरकारच्या एका आकडेवारीतून धक्कादायक बाब समोर आली आहे. सरकारने संसदेत सादर केलेल्या आकडेवारीवरुन असं समोर आलं की, उज्ज्वला योजनेच्या मोठ्या संख्येने लाभार्थींनी एलपीजी सिलिंडर एकदाही रिफिल केलेलं नाही. केंद्र सरकारने मागील काही दिवसांत उज्ज्वला योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या गॅस कनेक्शनच्या रिफिलिंगची आकडेवारी सांगितली. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात याबाबत माहिती दिली.

राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी दिलेल्या माहितीनुसार, उज्ज्वला योजनेच्या ४.१३ कोटी लाभार्थ्यांनी एकदाही एलपीजी सिलिंडर रिफिल केलेले नाही. तर ७.६७ कोटी लाभार्थ्यांनी एकदाच सिलिंडर रिफिल केला आहे.

विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांची माहिती मागितली होती. त्यावेळी उज्ज्वला योजना, तसंच सबसिडीबाबत ही माहिती, आकडेवारी देण्यात आली. सध्या केवळ उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सबसिडी आहे. रामेश्वर तेली यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१७-२०१८ दरम्यान ४६ लाख उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनी एकही सिलिंडर रिफिल केला नाही. तर केवळ एकदाच रिफिल करणाऱ्यांचा आकडा १.१९ कोटी होता.

२०१८-२०१९ दरम्यान १.२४ कोटी, २०१९-२०२० दरम्यान १.४१ कोटी, २०२०-२०२१ दरम्यान १० लाख आणि २०२१-२०२२ दरम्यान ९२ लाख लाभार्थ्यांनी एकदाही एलपीजी गॅस सिलिंडर या योजनेंतर्गत रिफिल केला नाही. २०१८-२०१९ दरम्यान २.९० कोटीस २०१९-२०२० दरम्यान १.८३ कोटी, २०२०-२०२१ दरम्यान ६७ लाक आणि २०२१-२०२२ दरम्यान १.०८ कोटी उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनी केवळ एकदा सिलिंडर रिफिल केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in