बिहारमध्ये ४३ जणांचा बुडून मृत्यू; १५ जिल्ह्यांमध्ये 'जीवितपुत्रिका' महोत्सवातील दुर्घटना

आपल्या मुलाबाळांचे कल्याण व्हावे यासाठी महिला उपवास करतात आणि मुलांसह नदीमध्ये पवित्र स्नान करतात.
बिहारमध्ये ४३ जणांचा बुडून मृत्यू; १५ जिल्ह्यांमध्ये 'जीवितपुत्रिका' महोत्सवातील दुर्घटना
प्रातिनिधिक फ्रीपिक फोटो
Published on

पाटणा : बिहारमध्ये जीवितपुत्रिका महोत्सवानिमित्त नदीत पवित्र स्नानासाठी गेलेल्या एकूण ४३ जणांचा विविध ठिकाणी घडलेल्या घटनांमध्ये बुडून मृत्यू झाला असून त्यामध्ये ३७ मुलांचा समावेश आहे, तर अन्य तीन जण बेपत्ता झाले आहेत, असे गुरुवारी राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आले.

बिहारमधील १५ जिल्ह्यांमध्ये बुधवारी जीवितपुत्रिका महोत्सवादरम्यान या घटना घडल्या आहेत. आपल्या मुलाबाळांचे कल्याण व्हावे यासाठी महिला उपवास करतात आणि मुलांसह नदीमध्ये पवित्र स्नान करतात. आतापर्यंत ४३ जणांचे मृतदेह मिळाले असून उर्वरितांचा कसून शोध घेतला जात आहे, असे आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

मृतांच्या नातेवाईकांना ४ लाखांची मदत जाहीर

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मृतांच्या नातेवाईकांना चार लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. पूर्व आणि पश्चिम चंपारण, नालंदा, औरंगाबाद, कैमूर, बक्सर, सिवान, रोहतास, सरण, पाटणा, वैशाली, मुझफ्फरपूर, समस्तीपूर, गोपाळगंज आणि अरवाल जिल्ह्यात भाविकांचा बुडून मृत्यू झाला आहे.

logo
marathi.freepressjournal.in