इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीत ४३ टक्के घट

जुलैमध्ये निव्वळ गुंतवणूक १५,४९५ कोटी रुपये झाली असून मे मध्ये हे प्रमाण १८,५२९ कोटी तर एप्रिलमध्ये १५,८९० कोटी रुपये होते
इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीत ४३ टक्के घट

जुलैमध्ये शेअर बाजारातील दोलायमान स्थिती लक्षात घेता इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जुलैमध्ये ४३ टक्के कमी होऊन ८,८९८ कोटी रुपये झाली. सलग १७व्या महिन्यात इक्विटीमध्ये सकारात्मक गुंतवणूक राहिली.

जुलैमध्ये निव्वळ गुंतवणूक १५,४९५ कोटी रुपये झाली असून मे मध्ये हे प्रमाण १८,५२९ कोटी तर एप्रिलमध्ये १५,८९० कोटी रुपये होते, अशी माहिती असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंडस‌् इन इंडिया (एएमएफआय - ॲम्फी)ने सोमवारी दिली. इक्विटी योजनेत मार्च २०२१ पासून गुंतवणूक वाढली आहे. यापूर्वी, जुलै २०२० ते फेब्रुवारी २०२१ म्हणजे गेल्या आठ महिन्यापासून ४६,७९१ कोटी रुपये काढून घेण्यात आले.

जुलैमध्ये इक्विटीशी निगडित योजनांमध्ये गुंतवणूक झाली असून सर्वाधिक गुंतवणूक स्मॉल कॅप फंडमध्ये १,७८० कोटी रुपये झाली. त्यानंतर फ्लेक्झी कॅप फंडमध्ये १,३८१ कोटी रुपये, लार्ज कॅप फंड, लार्ज ॲण्ड मिडकॅप फंडमध्ये १,००० कोटी रुपये गुंतवणूक झाली.

इक्विटीशिवाय, डेब्ट म्यु्च्युअल फंडमध्ये ४,९३० कोटी रुपयांची गुंतवणूक गेल्या महिन्यात झाली तर जूनमध्ये त्यामधून तब्बल ९२,२४७ कोटी रुपये काढून घेण्यात आले. याशिवाय, गेल्या महिन्यात गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंडस‌् (ईटीएफ)मध्ये ४५७ कोटी रुपये काढून घेण्यात आले तर गुंतवणूक १३५ कोटींची झाली.

म्युच्युअल फंड उद्योगात जुलैमध्ये सरासरी २३,६०५ कोटींची गुंतवणूक झाली तर ६९,८५३ कोटी रुपये काढून घेण्यात आले. नव्या गुंतवणुकीमुळे ॲसेट अंडर मॅनेजमेंट (एयूएम) उद्योगातील गुंतवणूक जुलैअखेरीस ३७.७५ लाख कोटी रुपये झालीअसून जूनअखेरीस ती ३५.६४ लाख कोटी रुपये होती.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in