देशात सक्रिय कोविड ४४४० प्रकरणांची नोंद
PM

देशात सक्रिय कोविड ४४४० प्रकरणांची नोंद

५ डिसेंबर २०२३ पर्यंत कोविडच्या दैनंदिन प्रकरणांची संख्या दुहेरी आकड्यांपर्यंत घसरली होती.

नवी दिल्ली : देशात पाच नवीन कोविड मृत्यूची नोंद झाली. तर विषाणूची ६०२ नवीन प्रकरणे आहेत, असे आरोग्य मंत्रालयाने बुधवारी सांगितले. संसर्गाच्या सक्रिय प्रकरणांची संख्या ४४४० वर नोंदली गेली आहे. केरळमधून दोन नवीन मृत्यूची नोंद झाली आहे, तर कर्नाटक, पंजाब आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी एकाची नोंद झाली आहे. केरळमध्ये, मृतांपैकी एक ६६ वर्षीय पुरुष तर दुसरी एक ७९ वर्षीय महिला असे दोन कोविडग्रस्त होते. ५ डिसेंबर २०२३ पर्यंत कोविडच्या दैनंदिन प्रकरणांची संख्या दुहेरी आकड्यांपर्यंत घसरली होती. परंतु नवीन प्रकार आणि थंड हवामानाच्या स्थितीनंतर प्रकरणे पुन्हा वाढली आहेत.

logo
marathi.freepressjournal.in