विदेशी गुंतवणूक संस्थांकडून ४४,५०० कोटींच्या समभागांची खरेदी

नऊ महिन्यात भारतीय शेअर बाजारातून २.४६ लाख कोटींच्या समभागांची विक्री केली होती.
विदेशी गुंतवणूक संस्थांकडून ४४,५०० कोटींच्या समभागांची खरेदी

विदेशी गुंतवणूक संस्थांनी (एफपीआय) ऑगस्टच्या तीन आठवड्यामध्ये तब्बल ४४,५०० कोटींच्या समभागांची खरेदी केली आहे. अमेरिकेतील महागाईत झालेली घट आणि डॉलरमध्ये झालेल्या घसरणीमुळे विदेशी गुंतवणूकदार बाजाराकडे वळल्याचे दिसते. यापूर्वी, सलग नऊ महिन्यानंतर (गेल्या ऑक्टोबरनंतर) पहिल्यांदा जुलै २०२२मध्ये एफपीआयने खरेदी सुरु केली. त्यांनी नऊ महिन्यात भारतीय शेअर बाजारातून २.४६ लाख कोटींच्या समभागांची विक्री केली होती.

जागतिक बाजारातील कल, रुपयाची स्थिती आणि विदेशी गुंतवणूक संस्थांकडून किती प्रमाणात खरेदी सुरु राहते, यावर भारतीय शेअर बाजाराचा कल अवलंबून आहे, असे विश्र्लेषकांचे म्हणणे आहे.

या आठवड्यात ऑगस्टमधील एफ ॲण्ड ओची समाप्ती आहे. त्यामुळे दलाल ऑगस्टमध्ये लाभ घेण्याचा प्रयत्न करतील, असे संतोष मीना, हेड ऑफ रिसर्च, स्वस्तिका इन्व्हेस्टमेंट लि. यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in