निवडणूक आयोगाकडून ४,६५८ कोटींची रक्कम जप्त; आतापर्यंतची सर्वात मोठी रक्कम

निवडणूक आयोगाकडून ४,६५८ कोटींची रक्कम जप्त; आतापर्यंतची सर्वात मोठी रक्कम

निवडणुकीची अधिकृत घोषणा होण्यापूर्वी जानेवारी आणि फेब्रुवारीत ७,५०२ कोटी रुपये जप्त केल्याचे आयोगाने सोमवारी सांगितले. जानेवारी ते १३ एप्रिलपर्यंत एकूण १२ हजार कोटींहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीची घोषणा १६ मार्च रोजी झाली.

नवी दिल्ली : सध्या लोकसभा निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. १ मार्च ते १३ एप्रिल या काळात निवडणूक आयोगाने देशातून ४,६५८.१३ कोटी रुपये जप्त केले आहेत. यात रोख रक्कम, सोने-चांदी, दारू, ड्रग्ज आणि मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे. १९५२ पासून आतापर्यंत देशात झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या इतिहासातील ही सर्वात मोठी जप्त झालेली रक्कम आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत आयोगाने ३,४७५ कोटी रुपये जप्त केले होते.

निवडणुकीची अधिकृत घोषणा होण्यापूर्वी जानेवारी आणि फेब्रुवारीत ७,५०२ कोटी रुपये जप्त केल्याचे आयोगाने सोमवारी सांगितले. जानेवारी ते १३ एप्रिलपर्यंत एकूण १२ हजार कोटींहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीची घोषणा १६ मार्च रोजी झाली. १ मार्चपासून रोज देशात १०० कोटी रुपये जप्त केले गेले आहेत. आतापर्यंत ४,६५८ कोटी रुपये जप्त केले गेले. त्यात ४८९ कोटींच्या मद्याचा समावेश आहे, तर २,०६९ कोटी रुपयांच्या अमली पदार्थांचा समावेश आहे. निवडणुकीत काळा पैशाचा वापर करून ४,६५८ कोटींची रक्कम जप्त

सर्वसमानतेचे तत्त्व पायदळी तुडवले जाते. गेल्या काही वर्षांत गुजरात, पंजाब, मणिपूर, नागालँड, त्रिपुरा व मिझोरमच्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम जप्त केली गेली.

१०६ सरकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई

या निवडणुकीत राजकीय नेत्यांना मदत करणाऱ्या १०६ सरकारी कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. तसेच एखाद्या नेत्याच्या हेलिकॉप्टरची झडती घेणे यात नवीन काहीही नाही, असे निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in