नववर्षानिमित्त ४.८ लाख बिर्याणीची ऑर्डर

रात्री ११ ते १२ या वेळेत १० लाख जण स्विगीच्या ॲॅपवर होते. १० लाख लोकांनी स्विगीवरून ऑर्डर दिल्या
नववर्षानिमित्त ४.८ लाख बिर्याणीची ऑर्डर
Published on

हैदराबाद : नववर्षाचे स्वागत देशात मोठ्या जल्लोषात करण्यात आले. एकट्या हैदराबादमध्ये एका रात्रीत ४.८ लाख बिर्याणीच्या ऑर्डर स्विगीवरून मागवण्यात आल्या, तर मिनिटाला सर्वाधिक १२४४ बिर्याणीच्या ऑर्डर देण्यात आल्या. हैदराबादच्या स्विगी इन्स्टामार्टवर चारपैकी एक ऑर्डर ही बिर्याणीची असायची. गेल्यावर्षी स्विगीवर ३.५० लाख बिर्याणीच्या, तर २.५ लाख पिझ्झाच्या ऑर्डर दिल्या गेल्या होत्या. यंदाच्या २०२४ च्या नववर्ष स्वागत दिनाला स्विगी फुड‌्स‌ व इन्स्टामार्टवर यापूर्वीचे सर्व विक्रम मोडले गेले, असे स्विगीचे फूड मार्केटप्लेसचे सीईओ रोहित कपूर यांनी सांगितले. रात्री ११ ते १२ या वेळेत १० लाख जण स्विगीच्या ॲॅपवर होते. १० लाख लोकांनी स्विगीवरून ऑर्डर दिल्या.

logo
marathi.freepressjournal.in