देशातील ४८ टक्के विद्यार्थी शाळेत जातात पायी

देशातील ४८ टक्के विद्यार्थी शाळेत जातात पायी

देशातील ४८ विद्यार्थी शाळेत चालत जातात. केवळ ९ टक्के मुले वाहनांचा उपयोग करतात, असे राष्ट्रीय उपलब्धता अहवालात आढळले आहे.

राष्ट्रीय उपलब्धता अहवालातून देशातील शिक्षण देशाचे समग्र दर्शन घडत असते. केंद्रीय शिक्षण खात्याने याबाबतचा अहवाल सादर केला.

१८ टक्के मुले सायकलने, ९ टक्के मुले सार्वजनिक वाहन, ९ टक्के मुले शालेय बस तर ८ टक्के मुले दुचाकी वाहनाने तर ३ टक्के मुले चारचाकी वाहनातून जातात.

शाळेत जाणाऱ्या मुलांच्या १८ टक्के आया या वाचू किंवा लिहू शकत नाहीत. तर ७ टक्के आया या साक्षर आहेत. ७२ टक्के विद्यार्थ्यांच्या घरात डिजीटल उपकरणे आहे. ८९ टक्के मुले शाळेत शिकवलेल्या बाबी घरात सांगतात. तसेच ७८ टक्के मुलांच्या घरात बोलली जाणारी भाषा व शाळेची भाषा समान आहे. ९६ टक्के मुलांना शाळेत जायला आवडते तर ९४ टक्के मुलांना शाळेत सुरक्षितता जाणवते.

कोरोनाच्या काळात देशातील ३८ टक्के मुलांना घरात शिक्षण घेताना अडचणींचा सामना करावा लागला. तर २४ टक्के विद्यार्थ्यांकडे कोणतेही डिजीटल उपकरण नव्हते. ४५ टक्के मुलांना घरात शिक्षण घेणे आनंददायक वाटले. तर ५० टक्के मुलांना घर व शाळेतील शिक्षणात कोणतीच अडचण वाटली नाही. तसेच राष्ट्रीय स्तरावर ७ टक्के शाळांमध्ये शिक्षक अनुपस्थित असल्याचे समोर आले.

३६ राज्य व केंद्रशासित प्रदेशात १.१८ लाख शाळांतून ३४ लाख विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in