
नवी दिल्ली : देशातील बँकांमधील ४८,४६१ कोटींचा ‘विनादावा’ निधी ठेवीदार शिक्षण जागृती निधीत जमा करण्यात आला आहे. बँकांतील १६७९३२११२ खात्यांमध्ये हा निधी पडून होता.
कॉर्पोरेट व्यवहार खात्याने सांगितले की, ३१ मार्च २०२३ रोजी ठेवीदार शिक्षण जागृती निधीत ५७१४.५१ कोटी रुपयांचा निधी होता, असे अर्थराज्य मंत्री भागवत कराड यांनी सांगितले.
आर्थिक फरार गुन्हे कायदा २०१८ मध्ये तयार केला. या अंतर्गत ‘ईडी’ने सांगितले की, ८ आर्थिक फरार गुन्हेगार ‘विलफुल डिफॉल्टर’ आहेत. ३४,११८.५३ कोटी रुपयांची रक्कम जप्त केली आहे, त्यापैकी १४,८३८.९१ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे आणि १५,११३.०२ कोटी रुपयांची मालमत्ता सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना परत देण्यात आली आहे. ‘विलफूल डिफॉल्डर’ना गेल्या १२ महिन्यांत कोणतेही नवीन कर्ज दिलेले नाही, असे ते म्हणाले.