निलंबन सत्र सुरूच! NCP च्या सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंसह आणखी ४९ खासदार निलंबित, निलंबनाचा आकडा तब्बल १४१

संसदीय कामकाज मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभेत गदारोळ घातल्याप्रकरणी विरोधी पक्षांच्या ४९ खासदारांना निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लायांनी या खासदारांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आल्याची घोषणा केली.
निलंबन सत्र सुरूच! NCP च्या सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंसह आणखी ४९ खासदार निलंबित, निलंबनाचा आकडा तब्बल १४१

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आज पुन्हा ४९ खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचा देखील समावेश आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ही कारवाई केली आहे. संसदेतील कथित घुसखोरीच्या मुद्यावरून संसदेच्या सुरक्षेविषयी प्रश्न उपस्थित करत विरोधकांनी आजही सरकारवर टीकेची झोड उठवली होती.या प्रकरणी सभागृहात प्रचंड गदारोळ केल्यामुळे लोकसभा अध्यक्षांनी ही कारवाई केली. यासोबतच यंदाच्या हिवाळी अधिवेशनात निलंबीत केलेल्या खासदारांची संख्या ही १४१ झाली आहे.

संसदीय कामकाज मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभेत गदारोळ घातल्याप्रकरणी विरोधी पक्षांच्या ४९ खासदारांना निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लायांनी या खासदारांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आल्याची घोषणा केली.निलंबित खासदारांत सुप्रिया सुळे व अमोल कोल्हे यांच्यासह शशी थरूर, डिंपल यादव, मनीष तिवारी, मोहम्मद फैजल, कार्ती चिदंबरम, सुदिप बंडोपाध्याय, दानिश अली, यांच्यासह एकूण ४९ खासदारांचा समावेश आहे. या खासदारांनी हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबीत करण्यात आले आहे.

खासदारांचे निलंबन करुन सरकार लोकशाहीचा गळा घोटत असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात आला आहे. तर काँग्रेस अध्यक्ष मल्लीकार्जून खर्गे, काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह विरोधी पक्षांच्या खासदारांकडून संसदेच्या परिसरात सरकारविरोधात आंदोलन सुरु आहे.

13 डिसेंबर रोजी संसदेच्या सुरक्षेत झालेल्या चुकीवर विरोधी पक्षांचे खासदारांनी दोन्ही सभागृहात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या निवेदनाची मागणी केली. याच मागणीला घेऊन संसदेच्या दोन्ही सभागृहातील खासदारांनी गोंधळ घातला. यानंतर लोकसभेच्या १३ आणि राज्यसभेच्या चौदा खासदार निलंबित केले गेले. यानंतर १८ डिसेंबर रोजी खासदारांनी निलंबित केलेल्या खासदारांचे निलंबन मागे घेण्यासाठी, तसेच संसदेत घुसखोरी केलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी करत पुन्हा गोंधळ घातल्याने लोकसभेच्या ३३ आणि राज्यसभेच्या ४५ खासदारांना संसदेचे हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबीत करण्यात आले. यानंतर आज पुन्हा ४९ खासदारांचे निलंब करण्यात आले. यामुळे हिवाळी अधिवेशनात निलंबित केलेल्या खासदारांची संख्या १४१ झाली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in