भारतात 4G मोबाईल उत्पादन बंद होणार

मंत्रालयाने मोबाइल ऑपरेटर आणि स्मार्टफोन निर्मात्यांसोबत बैठक घेतली आणि त्यांना ३ महिन्यांत 5G सेवेकडे वळण्याचे निर्देश दिले.
भारतात 4G मोबाईल उत्पादन बंद होणार

दहा हजार रुपये किंवा त्याहून अधिक किमतीच्या 4G स्मार्टफोनचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. कंपन्या आता १० हजारांपेक्षा जास्त किमतीचे 5G कनेक्टिव्हिटी स्मार्टफोन बनवतील. मोबाईल फोन उत्पादक कंपन्यांची बुधवारी भारत सरकारच्या उच्च अधिकाऱ्यांबरोबर बैठक झाली. त्यात त्यांनी वरील आदेश दिला.

दूरसंचार विभाग आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने मोबाइल ऑपरेटर आणि स्मार्टफोन निर्मात्यांसोबत बैठक घेतली आणि त्यांना ३ महिन्यांत 5G सेवेकडे वळण्याचे निर्देश दिले.

भारतात सध्या सुमारे ७५० दशलक्ष मोबाइल वापरकर्ते आहेत. यापैकी १०० दशलक्ष वापरकर्ते 5G स्मार्टफोन वापरत आहेत. परंतु, ३५० दशलक्ष वापरकर्ते अजूनही 3G आणि 4G कनेक्टिव्हिटी असलेल्या स्मार्टफोनवर आहेत. सर्व स्मार्टफोन निर्मात्यांनी सांगितले की, ते १० हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मोबाइलमध्ये 4G किंवा त्यापेक्षा कमी कनेक्टिव्हिटी जोडणार नाहीत.

टॉप स्मार्टफोन निर्मात्यांची बैठक तासभर

देशातील टॉप स्मार्टफोन निर्मात्यांसोबतची बैठक तासाभराहून अधिक काळ चालली. अ‌ॅपल, सॅमसंगसारख्या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसह दूरसंचार ऑपरेटरही बैठकीला पोहोचले. हा बदल ग्राहकांना सुरळीत 5G नेटवर्क देण्यासाठी केले जात आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in