चौथा इंडिया इंटरनॅशनल ईव्ही शो १५ मार्चपासून नवी दिल्लीत

या ईव्ही शो २०२४ मध्ये नवकल्पना आणि उद्योगाच्या पराक्रमाचे विद्युतील प्रदर्शन करण्याचे वचन दिले आहे.
चौथा इंडिया इंटरनॅशनल ईव्ही शो १५ मार्चपासून नवी दिल्लीत
Published on

नवी दिल्ली : चौथ्या ‘इंडिया इंटरनॅशनल ईव्ही शो’चे नवी दिल्ली येथे आयोजन करण्यात आले आहे. इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रातील हे महत्त्वपूर्ण प्रदर्शन १५ ते १७ मार्च २०२४ दरम्यान द्वारका नवी दिल्ली येथील इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन आणि एक्स्पो सेंटर (आयआयसीसी) येथे भरणार आहे. या ईव्ही शो २०२४ मध्ये नवकल्पना आणि उद्योगाच्या पराक्रमाचे विद्युतील प्रदर्शन करण्याचे वचन दिले आहे.

३०० हून अधिक प्रदर्शक विविध उत्पादने आणि सेवा सादर करणार आहेत/ तसेच येथे भेट देणाऱ्या व्यक्ती इलेक्ट्रिक वाहने, चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर आणि स्मार्ट मोबिलिटी सोल्यूशन्समध्ये पसरलेल्या ५००० हून अधिक अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा शोध घेऊ शकतात. प्रदर्शनात विविध चर्चासत्रे आणि परिसंवादांचे आयोजन करण्यात आले असून यावेळी बॅटरी तंत्रज्ञान आणि चार्जिंगच्या पायाभूत सुविधांचा विकास यांसारख्या प्रमुख विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे, असे फ्युचरेक्स ग्रुपचे संचालक नमित गुप्ता म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in