विषारी आयुर्वेदिक सिरप प्राशनाने ५ जणांचा मृत्यू

या प्रकरणी तीनजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यात दुकानदाराचाही समावेश आहे.
विषारी आयुर्वेदिक सिरप प्राशनाने ५ जणांचा मृत्यू

नाडियाद : गुजरातच्या खेडा जिल्ह्यात मिथाइल अल्कोहोल असलेल्या दूषित आयुर्वेदिक सिरपच्या संशयास्पद प्राशनानंतर गेल्या दोन दिवसांत किमान पाच जणांचा मृत्यू झाला. त्यातील आणखी दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली. खेडा जिल्ह्यातील नडियाद शहराजवळील बिलोदरा गावातील एका दुकानदाराने 'कालमेघासव - आसवा अरिष्ट' या नावाने ओळखले जाणारे आयुर्वेदिक सिरप जवळपास ५० लोकांना काउंटरवर विकल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

त्याची विक्री करण्यापूर्वी त्यात मिथाईल अल्कोहोल मिसळण्यात आले होते, असे एका गावकऱ्याच्या रक्त तपासणीमधून आढळून आले आहे, अशी माहिती खेडाचे पोलीस अधीक्षक राजेश गाधिया यांनी दिली. या प्रकरणात जे पाच जण मरण पावले आहेत, त्यांनी गेल्या दोन दिवसांमध्ये हे सिरप प्यायले होते. या प्रकरणी तीनजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यात दुकानदाराचाही समावेश आहे. मेथिल अल्कोहोल हा विषारी घटक असल्याचे पोलिसांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in