धक्कादायक! आईसोबत मोबाईलवर कार्टून बघताना ५ वर्षांच्या मुलीचा हृदयविकाराने मृत्यू

रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास महेश खरगवंशी यांची ५ वर्षांची मुलगी कामिनी अंथरुणात बसली होती.
धक्कादायक! आईसोबत मोबाईलवर कार्टून बघताना ५ वर्षांच्या मुलीचा हृदयविकाराने मृत्यू
Published on

अमरोहा : मोबाईलवर कार्टून पहात असताना उत्तर प्रदेशातील अमरोहा येथे ५ वर्षांच्या मुलीचा हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. ही मुलगी तिच्या आईसोबत मोबाईलवर कार्टून पाहत होती. तिच्या हातातून मोबाईल निसटला आणि जमिनीवर पडला. आईने मुलीकडे पाहिले, तोपर्यंत मुलीचा मृत्यू झाला होता. घाबरलेल्या कुटुंबाने मुलीला गावातील डॉक्टरांकडे नेले, तेथे मुलीला मृत घोषित करण्यात आले. मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे मानले जात आहे.

ही घटना हसनपूर कोतवाली परिसरातील हातियाखेडा गावातील आहे. जिथे शुक्रवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास महेश खरगवंशी यांची ५ वर्षांची मुलगी कामिनी अंथरुणात बसली होती. ती आईसोबत मोबाईलवर कार्टून पाहत होती. अचानक कामिनीच्या हातातून मोबाईल निसटला आणि ती खाली पडली. आधी आईला वाटलं ती मुद्दामहून असं करत असेल, पण जेव्हा तिला हलवलं तेव्हा तिने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे आई घाबरली. ती जोरजोरात ओरडू लागली, तेव्हा कुटुंबीय आणि आसपासचे लोक तिथे जमले. त्यांनी तातडीने मुलीला गावातील डॉक्टरांना दाखवण्यास नेले. तेथे डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केले.

शनिवारी सकाळी कुटुंबीयांनी तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. कामिनी ही तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी होती. तिचा पाचवा वाढदिवस ३० जानेवारीला साजरा होणार होता.

logo
marathi.freepressjournal.in