राजस्थानातील भाजपचे विद्यमान ५० टक्के खासदार घरी?

राजस्थानमध्ये संघटना पातळीवर भाजपने कामाला सुरुवात केली. २०१९ मध्ये पक्षाने ९ उमेदवार बदलले
राजस्थानातील भाजपचे विद्यमान ५० टक्के खासदार घरी?

जयपूर : येत्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून राजस्थानात विद्यमान ५० टक्के खासदारांना भाजप घरी बसवण्याची दाट शक्यता आहे. राजस्थानात लोकसभेच्या २५ जागा आहेत. विद्यमान सहा खासदारांनी यंदा विधानसभा निवडणूक लढवली आहे. त्यातील तीन जण आमदार म्हणून निवडून आले. हे तीन जण सोडून सलग दोनपेक्षा अधिक वेळ निवडून आलेल्या खासदारांना घरी बसवण्याची चिन्हे आहेत.

भाजपने गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत उत्तम कामगिरी केली. २०१८ मध्ये पोटनिवडणुकीत अजमेर व अलवरची जागा भाजपने गमावली. भाजपने २०१९ मध्ये २४ जागा लढवल्या, तर एक जागा आरएलपीला दिली. त्यावेळी राज्यात सत्तेत कॉँग्रेस आली. राम मंदिराच्या उद‌्घाटनानंतर २०२४ मध्ये पक्षाला सर्वच्या सर्व जागा मिळतील अशी आशा भाजपला आहे.

राजस्थानमध्ये संघटना पातळीवर भाजपने कामाला सुरुवात केली. २०१९ मध्ये पक्षाने ९ उमेदवार बदलले होते, तर यंदा १५ ते १८ उमेदवार बदलले जाण्याची शक्यता सूत्रांनी दिली. अजमेर, अलवर, जयपूर (ग्रामीण), राजसमंद, झुनझुनू व जालोर-सिरोही येथील उमेदवार बदलले जातील.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in