श्रीरामाची प्रतिमा असलेली ५०० रुपयांची नोट खोटी

अयोध्येत राम मंदिरात २२ जानेवारीला रामललाची प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम पार पडणार आहे. त्याआधी सध्या सोशल मीडियावर प्रभू श्रीरामाचा फोटो असलेला ५०० रुपयांचा फोटो व्हायरल होत आहे.
श्रीरामाची प्रतिमा असलेली ५०० रुपयांची नोट खोटी

मुंबई: काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रभू श्रीरामाचा फोटो असलेली ५०० रुपयांची नोट वेगाने फिरत आहे. यामुळे आरबीआयने ५०० रुपयांची नवीन नोट जारी केल्याची चर्चा सुरु झाली आहे. अयोध्येत राम मंदिरात २२ जानेवारीला रामललाची प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम पार पडणार आहे. त्याआधी सध्या सोशल मीडियावर प्रभू श्रीरामाचा फोटो असलेला ५०० रुपयांचा फोटो व्हायरल होत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकने ५०० रुपयांची नवी नोट जारी केल्याचा दावा केला जात आहे.

अयोध्येच्या मंदिरात आता प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा विधींना सुरुवात झाली असून २२ जानेवारीला हा सोहळा संपन्न होईल. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर ५०० रुपयांच्या नव्या नोटेचा फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये महात्मा गांधींऐवजी भगवान श्रीरामाचा फोटो आहे. रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी सरकारने नवीन ५०० रुपयांच्या नोटांवरून महात्मा गांधींचा फोटो काढून त्याजागी भगवान श्रीरामाचे फोटो लावल्याचा दावा केला जात आहे. फॅक्ट चेक करणाऱ्या वेबसाइटने सत्य तपासण्याचा प्रयत्न केला असता महत्त्वाची बाब समोर आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in