
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अमृत भारत स्थानक योजनेचा शूभारंभ करण्यात आला. या उपक्रमासाठी देशातील ५०८ रेल्वे स्थानकांची निवड करण्यात आली आहे. यासाठी २५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या स्थानकात महाराष्ट्रातील पाच विभागातील ४४ रेल्वेस्थानकांचा समावेश असून यासाठी १६९६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे आता महाराष्ट्रातील या ४४ स्थानकांचं रुपडं पालटणार असून नवीन अत्याधुनिक सोयी-सुविधांसह प्रवाशांच्या सेवेत सज्ज होणार आहे.
ही ५०८ स्थानके २७ राज्यआणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेली आहेत. ज्याद राजस्थान ५५, उत्तर प्रदेश ५५, बिहारमधील ४९, महाराषष्ट्रातील ४४ मध्य प्रदेशातील ३४, पश्चिम बंगालमधील ३७, आसाममधील ३२, ओडिशामधील २५, पंजाबमधील २२ स्थानकांचा समावेश आहे. तर गुजरातमधील २१ आणि तेलंगाणामधील २१, झारखंड २०, तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशमधील प्रत्येकी १८ कर्नाटकातील १३ तर हरियाणामधील १५ स्थानकांचा समावेश आहे.
या स्थानकांच्या पुनर्विकासामुळे प्रवाशांच्या मार्गदर्शनासाठी उत्तर डिझाईन असलेले वाहतूक संचलन, आंतर-मॉडल एकत्रीकरण आणि उत्तम प्रकारे डिझाईन केलेले चिन्ह नुनिश्चित करण्याबरोबरच आधुनिक प्रवासी सुविधा उपलब्ध होतील असं पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात येत आहे. तसंच या स्थानकांचा इमारती या स्थानिक संकृती, वारसा आणि वास्तुकला यांनी प्रेरित केल्या जातील. असं देखील पीएमओ कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.