१५ जुलैपर्यंत लग्नाचा सीझन! सहा महिन्यांत ४२ लाख विवाहांचा अंदाज, तब्बल 'इतक्या' कोटींची उलाढाल होणार

विवाह स्थळासाठी बँक्वेट हॉल, हॉटेल, लॉन, सामुदायिक केंद्र, सार्वजनिक पार्क, फार्म हाऊस व विवाह स्थळांची देशभरात बुकिंग झाली आहे.
१५ जुलैपर्यंत लग्नाचा सीझन! सहा महिन्यांत ४२ लाख विवाहांचा अंदाज, तब्बल 'इतक्या' कोटींची उलाढाल होणार

नवी दिल्ली : देशात १५ जानेवारी ते १५ जुलैपर्यंत लग्नाचा सीझन असून त्यात ४२ लाख विवाह होणार आहेत. या लग्नातून ५.५० लाख कोटी रुपयांच्या व्यवसायाची अपेक्षा आहे. एकट्या दिल्लीत चार लाख विवाह होणार असून १.५० लाख कोटींची खरेदी-विक्री होईल. अखिल भारतीय व्यापारी महासंघटनेने (कॅट) जारी केलेल्या सर्वेक्षणात हा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

गेल्यावर्षी १४ डिसेंबर रोजी संपलेल्या लग्नसराईच्या काळात ३५ लाख लग्न झाली. त्यातून ४.२५ लाख कोटी रुपयांचा व्यवसाय झाला. अखिल भारतीय व्यापारी महासंघटनेच्या (कॅट) संशोधन विभागाने सांगितले की, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा सात लाख अधिक लग्न होतील, तर व्यवसायही १.२५ लाख कोटी रुपये अधिक होईल.

‘कॅट’चे राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल म्हणाले की, देशातील व्यापाऱ्यांनी पूर्ण तयारी केली आहे. ग्राहकांच्या पसंतीनुसार, सर्व सामानांचा साठा करून ठेवला आहे. दागिने, साडी, लेहंगा-चुनरी, फर्निचर, कपडे, बुटं, सुकामेवा, मिठाई, फळ, पूजा वस्त्र, किराणा, इलेक्ट्रिकल सामान, इलेक्ट्रॉनिक्स आदी विविध उत्पादनांची मागणी अधिक आहे.

फार्म हाऊसपासून बँक्वेट हॉल बुक

विवाह स्थळासाठी बँक्वेट हॉल, हॉटेल, लॉन, सामुदायिक केंद्र, सार्वजनिक पार्क, फार्म हाऊस व विवाह स्थळांची देशभरात बुकिंग झाली आहे. तंबू, सजावट, क्रॉकरी, कॅटरिंग सेवा, कॅब सेवा, फोटोग्राफर-व्हिडीओग्राफर, बँड, डीजे, बग्गी, लाइट, ढोल, ताशे आदींचे बुकिंग होत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in