मुंबर्इ आयआयटी विद्यार्थ्यांकडून संस्थेला ५७ कोटींची देणगी

आयआयटी मुंबर्इच्या विकासाला चालना मिळणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
मुंबर्इ आयआयटी विद्यार्थ्यांकडून संस्थेला ५७ कोटींची देणगी

नवी दिल्ली : मुंबर्इ आयआयटी या प्रख्यात उच्च अभियांत्रिकी शिक्षण संस्थेत शिक्षण पूर्ण केलेल्या १९९८ सालच्या तुकडीतील विद्यार्थ्यांनी आपल्या संस्थेला २५व्या पुनर्मिलन सोहळ्याचे औचित्य साधून ५७ कोटी रुपये देणगी दिली आहे. एखाद्या वर्गाकडून संस्थेला आलेली ही आतापर्यंतची सर्वाधिक रकमेची देणगी आहे. 

देणगीदारांमध्ये सिल्व्हर लेक संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अपूर्व सक्सेना, तसेच पीक एक्सव्हीचे व्यवस्थापकीय संचालक शैलेंद्र सिंग यांनी या आधीचा ४१ कोटी रुपये देणगीचा विक्रम मोडीत काढला आहे. १९७१ सालच्या तुकडीने यापूर्वी ४१ कोटींची देणगी संस्थेला दिली आहे. १९९८ तुकडीतील २०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी देणगीमध्ये योगदान दिले आहे. यात व्हेक्टर कॅपिटलचे व्यवस्थापकीय संचालक अनुपम बॅनर्जी, एआय रिसर्चचे दिलीप जॉर्ज, गुगल डीपमाइंड ग्रेट लर्निंग सीर्इओ मोहन लकहमराजू, मनू वर्मा, सुंदर अय्यर, संदीप जोशी, श्रीकांत शेट्टी यांचा समावेश आहे. आयआयटी मुंबर्इचे संचालक सुभाशिष चौधरी यांनी १९९८ तुकडीच्या देणगीमुळे आयआयटी मुंबर्इच्या विकासाला चालना मिळणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in