देशभरात कोविडचे ५७३ नवे रुग्ण ;दोघे दगावले

जेएन-१ हा नवा व्हेरियंट आल्यानंतर रुग्ण नोंदीची संख्या पुन्हा झपाट्याने वाढली आहे.
देशभरात कोविडचे ५७३ नवे रुग्ण ;दोघे दगावले

नवी दिल्ली : मंगळवारी दिवसभरात संपूर्ण देशात ५७३ नव्या कोविड-१९ रुग्णांची नोंद झाली. यामुळे देशातील कोविड-१९ बाधित सक्रिय रुग्णांची एकूण संख्या ४५६५ झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तसेच कर्नाटक आणि हरयाणा या दोन राज्यांमध्ये प्रत्येकी एक मिळून दोन कोविड रुग्ण दगावले असल्याची माहिती देखील सरकारने दिली आहे. ५ डिसेंबरपर्यंत देशातील दैनिक रुग्ण नोंदीची संख्या दोन अंकी संख्येपर्यंत घसरली होती. मात्र जेएन-१ हा नवा व्हेरियंट आल्यानंतर रुग्ण नोंदीची संख्या पुन्हा झपाट्याने वाढली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in