४जी सेवेच्या तुलनेत ५जी सेवा महाग ठरणार; ग्राहकांना २० टक्क्यांपर्यत जास्तीचा खर्च करावा लागणार

सध्याच्या स्तरावर प्रति ग्राहक सरासरी कमाई (एआरपीयु) राखण्यासाठी, दर वाढवावे लागतील.
४जी सेवेच्या तुलनेत ५जी सेवा महाग ठरणार;  ग्राहकांना २० टक्क्यांपर्यत जास्तीचा खर्च करावा लागणार
Published on

४जी सेवेच्या तुलनेत ५जी सेवा महागडी ठरणार असून ही सेवा घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना २० टक्क्यांपर्यत जास्तीचा खर्च करावा लागू शकतो. ५जी सर्व्हिसेजसाठी टेलीकॉम ऑपरेटर सुरुवातीला ४जीच्या तुलनेत १०-२० टक्के जास्त दर आकारू शकतात, असे नोमुरा रिसर्चच्या एका अहवालात म्हटले आहे.

जपानच्या ब्रोकरेज फर्मनुसार, ५ जी सेवा सुरु झाल्यानंतर भारतीय टेलीकॉम ऑपरेटर्सला सध्याच्या स्तरावर प्रति ग्राहक सरासरी कमाई (एआरपीयु) राखण्यासाठी, दर वाढवावे लागतील. ५जी सर्व्हिसेज सी-बँड (३.३-३.६७ गीगा हर्ट्ज) एअरवेजवर ऑफर केले जातील. ४जीच्या तुलनेत १०पट जास्त स्पीडची ही सेवा शहरी भागाच्या श्रीमंत ग्राहकांना लक्ष्य करुन सुरू केली जाईल. नोमुराच्या अहवालामध्ये म्हटले आहे की, ‘टेलीकॉम ऑपरेटर सुरुवातीला ५जी सेवेत ग्राहकांच्या आवडीवर नजर ठेवतील. ते एआरपीयू वाढवण्याची पुढची पायरी म्हणून पाहतील. महागड्या स्पेक्ट्रमची किंमत शोधणे हे त्यांचे पहिले प्राधान्य असेल. मात्र त्यासाठी वेळ लागेल. एका अन्य ग्लोबल ब्रोकरेज फर्मच्या रिपोर्टनुसार, सुरुवातीला भारतात ५जी सेवा २० टक्क्यांपर्यंत महाग होईल. शहरी ग्राहकांसाठी असेल आणि जे महागडे ५जी हँडसेट विकत घेण्यासाठी तयार असतील.भारती एअरटेलच्या मते, ५जी सेवा सुरू झाल्यानंतर एआरपीयू २०० रुपयांपर्यंत वाढवावा लागेल.

logo
marathi.freepressjournal.in