5G आल्यामुळे देशाच्या विकासाला गती मिळणार,डेल टेक्नॉलॉजी इंडियाचा दावा

देशात हाय-स्पीड इंटरनेट सेवा देण्यासाठी, 5G स्पेक्ट्रम लिलाव १.५० लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
5G आल्यामुळे देशाच्या विकासाला गती मिळणार,डेल टेक्नॉलॉजी इंडियाचा दावा

5G आल्यानंतर देशाच्या विकासाला गती येईल. 5G मुळे देशात वेगवान इंटरनेट, औद्योगिक इंटरनेट ऑफ थिंग्ज, एज कॉम्प्युटिंग, कृषी क्षेत्रात रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा वापर, ई-कॉमर्स, आरोग्य सेवा, शिक्षण आणि फार्मा यासारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा जलद विकास होईल. 5G कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वाढविण्यात, उद्योगातील उत्पादन खर्च कमी करण्यास आणि गुणवत्ता वाढविण्यात देखील मदत करेल, असे डेल टेक्नॉलॉजी इंडियाचे कार्यकारी मनीष गुप्ता यांनी रविवारी सांगितले.

देशात हाय-स्पीड इंटरनेट सेवा देण्यासाठी, 5G स्पेक्ट्रम लिलाव १.५० लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. डेल टेक्नॉलॉजी कंपनी लवकरच भारतातील खेडे आणि शहरांमध्ये 5G ची वेगवान वाढ पाहणार आहे. गुप्ता म्हणाले की, G स्पेक्ट्रमच्या लिलावात महसुलाचे नवीन विक्रम सातत्याने होत आहेत. शनिवारपर्यंत हा आकडाही दीड लाख कोटींच्या पुढे गेला आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, लिलाव देखील २०१५ची विक्रमी पातळी ओलांडत आहे. २०१५ मध्ये, 4G स्पेक्ट्रम लिलावातून १.०९ लाख कोटी रुपयांचा विक्रमी महसूल जमा झाला होता. तर 5G स्पेक्ट्रम लिलावाचा आकडा जवळपास दुप्पट झाला आहे. देशात हाय-स्पीड इंटरनेट सेवा देण्यासाठी २६ जुलैपासून 5G स्पेक्ट्रमचा लिलाव सुरू झाला आहे. या लिलावात रिलायन्स जिओ, भारती एअरटेल, व्होडाफोन-आयडिया आणि अदानी एंटरप्रायजेस या कंपन्या सामील झाल्या आहेत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in