खैबर पख्तुनवा प्रांतात ६ मजुरांची हत्या

या हत्येची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारली नाही.याच जिल्ह्यात ऑगस्टमध्ये ११ मजुरांना ठार करण्यात आले होते.
खैबर पख्तुनवा प्रांतात ६ मजुरांची हत्या
PM
Published on

पेशावर : पाकिस्तानच्या अशांत अशा प्रांतात शुक्रवारी अज्ञात अतिरेक्यांनी पोलीस ठाण्याच्या बांधकामाच्या जागेवर काम करणाऱ्या किमान सहा मजुरांची गोळ्या घालून हत्या केली, असे पोलिसांनी सांगितले. दक्षिण वझिरीस्तान आदिवासी जिल्ह्यातील वाना येथे ही घटना घडली.मजूर त्यांच्या तंबूत असताना अज्ञात अतिरेक्यांनी पॉईंट-ब्लँक रेंजवर गोळ्या झाडल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान या हत्येची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारली नाही.याच जिल्ह्यात ऑगस्टमध्ये ११ मजुरांना ठार करण्यात आले होते.

logo
marathi.freepressjournal.in