काश्मीरमधील दोन चकमकीत ६ दहशतवादी ठार, २ जवान शहीद

जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात दोन ठिकाणी झालेल्या चकमकीत सहा दहशतवादी ठार झाले, तर दोन जवानही शहीद झाले आहेत.
काश्मीरमधील दोन चकमकीत ६ दहशतवादी ठार, २ जवान शहीद

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात दोन ठिकाणी झालेल्या चकमकीत सहा दहशतवादी ठार झाले, तर दोन जवानही शहीद झाले आहेत.

मोदेरगाम या चकमकीच्या स्थळावरून दोन दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले, तर अन्य चार जणांचे मृतदेह चिन्नीगाम येथून ताब्यात घेण्यात आले. दहशतवाद्यांशी लढताना एका निमकमांडोसह लष्कराचे दोन जवान शहीद झाले आहेत.

इतक्या मोठ्या प्रमाणावर दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आल्याची ही अलीकडच्या काळातील पहिलीच घटना आहे, असे जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक आर. आर. स्वाइन यांनी सांगितले. जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाचा संपूर्ण नायनाट करण्याचा हा अखेरचा टप्पा असल्याचे या कारवाईच्या यशावरून स्पष्ट होत असल्याचे ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in