मंगळुरू विमानतळावर ६० लाखांचे सोने जप्त

२४ कॅरेट पिवळ्या रंगाच्या पेस्टच्या स्वरूपात जप्त केलेले सोने दोन प्रवाशांनी घातलेल्या बुटांच्या तळव्यामध्ये कल्पकतेने लपवले होते
मंगळुरू विमानतळावर ६० लाखांचे सोने जप्त

मंगळुरू : दुबईहून एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाने येथे आलेल्या तीन प्रवाशांकडून मंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी ६० लाख ७ हजार ८०० रुपये किमतीचे ९६९ ग्रॅम सोने जप्त केले आहे. ११ डिसेंबर रोजी ही जप्ती करण्यात आली होती, असे कस्टमने गुरुवारी येथे सांगितले. २४ कॅरेट पिवळ्या रंगाच्या पेस्टच्या स्वरूपात जप्त केलेले सोने दोन प्रवाशांनी घातलेल्या बुटांच्या तळव्यामध्ये कल्पकतेने लपवले होते. आणखी एका प्रवाशाने चॉकलेट बॉक्स आणि बेडस्प्रेड पॅकेटमध्ये सोने लपवले होते, असे कस्टमच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in