युनियन बँकेच्या निव्वळ नफ्यात ६० टक्के वाढ

युनियन बँक ऑफ इंडियाने शनिवारी डिसेंबरला संपलेल्या तिमाही निकाल जाहीर केला.
युनियन बँकेच्या निव्वळ नफ्यात ६० टक्के वाढ

मुंबई : युनियन बँक ऑफ इंडियाने शनिवारी डिसेंबरला संपलेल्या तिमाही निकाल जाहीर केला. बँकेच्या तिमाही निव्वळ नफ्यात ६० टक्क्यांनी वाढ होऊन ३,५९० कोटी झाला. बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी ए. मणिमेखलाई यांनी पत्रकारांना सांगितले की, कर्ज वितरणामध्ये ११.४४ टक्क्यांनी वाढ होऊन ते ८,९५,९७४ कोटी रुपयांवर गेले आहे. तर तिमाहीत बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न वार्षिक ६.२६ टक्क्यांनी वाढून ९,१६८ कोटी रुपये झाले आहे. इतर उत्पन्नात १५.४ टक्क्यांनी वाढ होऊन ३,७७४ कोटी रुपये झाले. ‘कासा’ ठेवींमध्ये ५.६२ टक्क्यांनी वाढ होऊन एकूण ठेवी १०.०९ टक्क्यांनी वाढून ११,७२,४५५ कोटी रुपये झाल्या. बँकेचा एनपीए १०६ बीपीएस कमी होऊन १.०८ टक्के झाला.

logo
marathi.freepressjournal.in