भारतीय अंतराळ क्षेत्र खुले केल्यामुळे ६० स्टार्ट-अप्सनी इस्रोकडे नोंदणी

इतर स्टार्ट-अप प्रस्ताव नॅनो-सॅटेलाइट, प्रक्षेपण वाहन, ग्राउंड सिस्टीम, संशोधनाशी निगडित आहेत.
 भारतीय अंतराळ क्षेत्र खुले केल्यामुळे ६० स्टार्ट-अप्सनी इस्रोकडे नोंदणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच भारतीय अंतराळ क्षेत्र खुले केल्यापासून सुमारे ६० स्टार्ट-अप्सनी इस्रोकडे नोंदणी केली आहे आणि यापैकी काही अंतराळातील कचऱ्याच्या व्यवस्थापनाशी संबंधित प्रकल्पांवर काम करत आहेत. तर इतर स्टार्ट-अप प्रस्ताव नॅनो-सॅटेलाइट, प्रक्षेपण वाहन, ग्राउंड सिस्टीम, संशोधनाशी निगडित आहेत.

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)भू विज्ञान; पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज बंगळुरू येथील इस्रो नियंत्रण केंद्र येथे ‘सुरक्षित आणि शाश्वत कामकाजासाठी इस्रो प्रणाली’ (IS4OM) चे उद्घाटन केल्यानंतर बोलत होते.

डॉ. जितेंद्र सिंह यांनी आठवण करून दिली की, गेल्याच महिन्यात अहमदाबाद येथे इन -स्पेस मुख्यालयाच्या उद्घाटनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते, “जेव्हा सरकारी अंतराळ संस्थांची ताकद आणि भारताच्या खासगी क्षेत्राला वाटणारे आकर्षण एकत्र येतील तेव्हा आकाशही ठेंगणे वाटेल.” खासगी कंपन्या आणि अभिनव स्टार्ट-अप्सच्या उत्साहामुळे अंतराळ वाहतूक, कचरा व्यवस्थापन, पायाभूत सुविधा आणि वापर या क्षेत्रांमध्ये सर्वांगीण क्षमता विकसित करून अंतराळातील भारताचे हित जपण्याच्या अंतराळ विभागाची विस्तारेल, याचा त्यांनी पुनरुच्चार केला. डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, IS4OM सुविधा वापरकर्त्यांना अंतराळातील वातावरणाची व्यापक आणि योग्य वेळेत माहिती देऊन भारताला अवकाशातील परिस्थितीबाबत जागरूकता (स्पेस सिच्युएशनल अवेअरनेस) संबंधी उद्दिष्टे साध्य करण्यात मदत करेल. हे बहु-क्षेत्रीय जागरूकता व्यासपीठ अवकाशातील टक्कर, विखुरणे, वातावरणातील पुन:प्रवेश धोका, अवकाश आधारित धोरणात्मक माहिती, धोकादायक लघुग्रह आणि अवकाशातील हवामानाचा अंदाज संबंधी त्वरित, अचूक माहिती पुरवेल. राष्ट्रीय विकासासाठी बाह्य क्षेत्राच्या शाश्वत वापराचे लाभ मिळवताना सुरक्षितता आणि शाश्वतपणा सुनिश्चित करण्याच्या सर्वांगीण दृष्टिकोनातून या सुविधेची संकल्पना पुढे आली यावर त्यांनी भर दिला. डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, घातपात आणि अवकाशातील वस्तू आणि अवकाशातील कचरा जवळ येऊन घडणाऱ्या अपघातांपासून भारताची अवकाशातील मालमत्ता सुरक्षित ठेवण्यासाठी इस्रो आवश्यक ती सर्व काळजी घेत असते. अवकाश स्थितीय जागरूकता कार्यवाहीचे अनेक राजकीय परिणाम आहेत. जसे की, भारताच्या अवकाशातून जाणाऱ्या तसेच जवळून जाणाऱ्या इतर कार्यान्वित अवकाश यानांवर नजर ठेवणे आणि त्यांची ओळख पटवणे, संशयास्पद उद्देशाने मुद्दाम केलेला खोडसाळपणा आणि भारतीय क्षेत्रात पुनर्प्रवेश यावर लक्ष ठेवणे, असे डॉ सिंह म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in