गोल्ड ईटीएफमध्ये जानेवारीत ६५७ कोटींचा ओघ

२०२३ मध्ये गोल्ड ईटीएफमध्ये २,९२० कोटी रुपयांचा ओघ आला, जो २०२२ मध्ये ४५९ कोटी रुपयांच्या प्रवाहापेक्षा जास्त होता.
गोल्ड ईटीएफमध्ये जानेवारीत ६५७ कोटींचा ओघ

नवी दिल्ली : गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंड्स (ईटीएफ) मध्ये जानेवारीमध्ये ६५७ कोटी रुपयांचा ओघ आला असून मागील महिन्याच्या तुलनेत त्यात सात पटीने वाढ झाली आहे, असे ॲम्फीच्या आकडेवारीवरून दिसते. डिसेंबर अखेरीस २७,३३६ कोटी रुपयांच्या तुलनेत गोल्ड फंडांच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता (एयूएम) १.६ टक्क्यांनी वाढून जानेवारीच्या अखेरीस रु. २७,७७८ कोटींवर गेली, असे असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (ॲम्फी) च्या आकडेवारीतून दिसून आले. गोल्ड ईटीएफमधील निव्वळ ओघ जानेवारीत ६५७.४ कोटी रुपयांवर गेला असून मागील महिन्यातील ८८.३ कोटी रुपयांच्या तुलनेत त्यात मोठी वाढ झाली. टाटा गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंडाच्या लाँचनंतर त्यात ६ कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याने वाढीस मदत झाली. २०२३ मध्ये गोल्ड ईटीएफमध्ये २,९२० कोटी रुपयांचा ओघ आला, जो २०२२ मध्ये ४५९ कोटी रुपयांच्या प्रवाहापेक्षा जास्त होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in