
नारायणपूर : छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यात गुरुवारी सुरक्षा दलांसमवेत झालेल्या चकमकीत किमान सात नक्षलवादी ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दल यांनी अभुजमाद जंगलात पहाटे नक्षलवाद्यांविरुद्ध मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेदरम्यान ही चकमक उडाली. चकमक थांबल्यानंतर घटनास्थळी सात नक्षलवाद्यांचे मृतदेह पोलिसांना मिळाले. या परिसरात अद्यापही शोधमोहीम सुरू आहे. नारायणपूर, दंतेवाडा, बस्तर आणि कोंडागाव जिल्ह्यातील जिल्हा राखीव दलाचे कर्मचारीही मोहिमेत सहभागी झाले होते.