देशभरात घरांच्या किमतीत ७ टक्के वाढ

मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, पुणे, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद आणि कोलकाता या शहरांमध्ये प्रति चौरस फूट सरासरी किंमतीत लक्षणीय वाढ
देशभरात घरांच्या किमतीत ७ टक्के वाढ
Published on

देशभरातील घरांच्या किमती झपाट्याने वाढ होताना दिसत असून, प्रमुख शहरांमधील मालमत्तांच्या सरासरी किमतीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या तिमाहीत जवळपास ७ टक्के वाढ झाली आहे. अहवालानुसार, मुंबई परिसरातील घरांच्या किमतीत ५ टक्के, तर पुणे परिसरातील घरांच्या किमती ८ वाढ झाल्याची दिसून येत आहे.

प्रॉपटीगरच्या अहवालानुसार, मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, पुणे, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद आणि कोलकाता या शहरांमध्ये प्रति चौरस फूट सरासरी किंमतीत लक्षणीय वाढली झाली आहे. या अहवालानुसार, तीन महिन्यांत, बेंगळुरूमधील १० % वाढीच्या तुलनेत मुंबईमध्ये मालमत्तेच्या किमतीमध्ये सर्वाधिक सरासरी ५% वाढ झाली. तर पुणे आणि अहमदाबाद ही शहरे मालमत्ता किंमत वाढीच्या बाबतीत मागे असून, या शहरांमधील सरासरी मालमत्ता दरांमध्ये अनुक्रमे ८% आणि ७% वाढ झाली आहे.

याबद्दल प्रॉपटीगरच्या रिसर्च हेड अंकीता सूद म्हणाल्या की, “गेल्या वर्षापासून भारतातील शहरांमधील मालमत्तेच्या किमती ६-७% वेगाने वाढत आहे. विशेष म्हणजे, वर्षाच्या सुरुवातीला पहिल्या तिमाहीत सरासरी किमती ६% ने वाढल्या असताना, गुरुग्राम, त्यानंतर बेंगळुरू या शहरांमधील प्रमुख बाजारांमध्ये अनुक्रमे १३ टक्के आणि १० टक्क्यांनी वार्षिक वाढ झाली आहे. मागणी-पुरवठ्याच्या विसंगतीचा सध्याचा बाजारातील ट्रेंड लक्षात घेता, मालमत्तेच्या किमती अगदी मर्यादेत वाढल्या पाहिजेत.

'या' कारणांमुळे वाढ

प्रॉपटीगरच्या अहवालानुसार, देशातील महत्वाच्या शहरांमध्ये घरांच्या मागणीत वाढ झाली आहे. कच्चा मालाच्या किमतीसह मजुरांच्या किमतीत झालेली वाढ, कोविडनंतर घरांची वाढती मागणी तसेच यावर्षी मार्चमध्ये सरकारी अनुदानित अनुदान योजना बंद झाल्यामुळे ही वाढ झाली आहे.

logo
marathi.freepressjournal.in