छत्तीसगडमध्ये ७१ नक्षलींचे आत्मसमर्पण

छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात बुधवारी ७१ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. त्यापैकी ३० नक्षलवाद्यांवर एकत्रित ६४ लाख रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आले होते, असे पोलिसांनी सांगितले.
छत्तीसगडमध्ये ७१ नक्षलींचे आत्मसमर्पण
Photo : X
Published on

दंतेवाडा : छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात बुधवारी ७१ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. त्यापैकी ३० नक्षलवाद्यांवर एकत्रित ६४ लाख रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आले होते, असे पोलिसांनी सांगितले.

आत्मसमर्पण केलेल्या या ७१ नक्षलवाद्यांमध्ये २१ महिलांचा समावेश आहे. माओवादी विचारसरणीचा उबग आल्याचे या नक्षलवाद्यांनी सांगितले. त्यांनी सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण केले. त्यामध्ये १७ वर्षांचा एक मुलगा आणि १६ व १७ वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींचा समावेश आहे.

बस्तर परिमंडळ पोलीस आणि राज्य सरकारने आखलेल्या नव्या पुनर्वसन धोरणांमुळे प्रभावित होऊन आत्मसमर्पण केल्याचे या नक्षलवाद्यांनी म्हटले आहे. आत्मसमर्पण केलेल्या सर्व नक्षलवाद्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे अर्थसाह्य देण्यात आले असून त्यांचे धोरणानुसार पुनर्वसन केले जाणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in