
नवी दिल्ली : महिला व एकल पुरुष सरकारी कर्मचाऱ्यांना बाल संगोपनासाठी ७३० दिवसांची रजा दिली जाते, अशी माहिती केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी दिली.
केंद्रीय नागरी सेवा (रजा) नियम १९७२ च्या कलम ४३ सीनुसार, सरकारी महिला कर्मचारी व एकल पुरुषांना बाल संगोपनासाठी ही रजा दिली जाते. ही रजा केवळ दोन मुलांपर्यंतच दिली जाते.