दोन वर्षांत लष्कर-ए-तैबाच्या ७९ दहशतवाद्यांचा खातमा

झालेल्या झटपटीत ३५ दहशतवादी ठार झाले आहेत पैकी २७ जण अनोळखी आहेत
दोन वर्षांत लष्कर-ए-तैबाच्या ७९ दहशतवाद्यांचा खातमा
Published on

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील भारतीय सुरक्षा दलांनी मिळून गेल्या दोन वर्षांमध्ये लष्कर-ए-तैबा अतिरेकी संघटनेच्या तब्बल ७९ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले असल्याची माहिती मंगळवारी अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आली आहे.

अधिकारी पातळीवरून मिळालेल्या माहितीनुसार, यंदा जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी केलेल्या संयुक्त कारवार्इत किमान ३५ दहशतवादी मारले गेले आहेत. त्यापैकी २७ जणांची ओळख पटली नसून, ५ जण द रेझिस्टन्स फ्रंट टोळीतील होते. २०२२ साली एकूण १२९ दहशतवाद्यांपैकी ९३ स्थानिक होते, तर ३६ अनोळखी होते. मात्र २०२३ साली जुलैपर्यंत २७ अनोळखी दहशतवादी मारले गेले आहेत.

काश्मीर खोऱ्यात अनेक दहशतवादी संघटना कार्यरत आहेत. त्यात हिजबुल मुजाहिदीन, तेहरिक-अल-मुजाहिदीन, अल-बद्र, घझवात-अल-हिंद, इस्लामिक स्टेट जम्मू अँड काश्मीर, लष्कर-ए-मुस्तफा, द रेझिस्टन्स फ्रंट, लष्कर-ए-तैबा या संघटनांचा प्रामुख्याने समावेश आहे. या वर्षी भारताने अनेक घुसखोरीचे प्रयत्न निष्फळ केले आहेत. त्यावेळी झालेल्या झटपटीत ३५ दहशतवादी ठार झाले आहेत. पैकी २७ जण अनोळखी आहेत.

logo
marathi.freepressjournal.in