पंजाबमध्ये नाल्यात बस कोसळून ८ ठार

पंजाबमधील भटिंडा येथे शुक्रवारी सकाळी झालेल्या एका भीषण अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत.
पंजाबमध्ये नाल्यात बस कोसळून ८ ठार
एक्स @younishpthn
Published on

चंदिगढ : पंजाबमधील भटिंडा येथे शुक्रवारी सकाळी झालेल्या एका भीषण अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत. एका खासगी कंपनीची बस नियंत्रण सुटून थेट नाल्यात कोसळल्याने हा अपघात घडला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि एनडीआरएफचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आणि नंतर ते नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, भटिंडा येथील कोटशमीर रोड येथे एक बस पुलावरून जात असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बस नाल्यात कोसळली. स्थानिक प्रशासन, आपत्कालीन पथक आणि एनडीआरएफच्या पथकाने

तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. बसमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी वेगाने बचावकार्य राबवण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in