देशांतर्गत हवाई वाहतुकीत ८ टक्के वाढ; २०२३ साली १५.२० कोटी जणांचा विमान प्रवास

नागरी उड्डाण महासंचालनालयाकडील माहितीनुसार ३१ डिसेंबर २०२२ रोजी देशांतर्गत विमान प्रवाशांची एकूण संख्या १२.३२ कोटी होती.
देशांतर्गत हवाई वाहतुकीत ८ टक्के वाढ; २०२३ साली १५.२० कोटी जणांचा विमान प्रवास

मुंबर्इ: नुकत्याच संपलेल्या २०२३ साली संपूर्ण वर्षभरात देशांतर्गत विमान प्रवाशांच्या संख्येत तब्बल ८.३४ टक्के वाढ झाली असून आता एकूण देशांतर्गत विमान प्रवाशांची संख्या १५.२० कोटी झाली आहे.

नागरी उड्डाण महासंचालनालयाकडील माहितीनुसार ३१ डिसेंबर २०२२ रोजी देशांतर्गत विमान प्रवाशांची एकूण संख्या १२.३२ कोटी होती. डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल ॲव्हिएशनने सोमवारी ही आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार डिसेंबर २०२३ मध्ये देशांतर्गत विमानप्रवाशांची संखया २३.३६ टक्क्यांनी वाढून १.३७ कोटी झाली.

२०२२ साली डिसेंबर महिन्यात ही संख्या १.२७ कोटी होती. देशांतर्गत विमान प्रवासात देशात इंडिगो विमान वाहतूक कंपनी आघाडीवर आहे. या कंपनीचा एकूण प्रवासी संख्येत ६०.५ टक्के वाटा आहे. कंपनीने २०२३ साली ९.१९ कोटी प्रवाशांची वाहतूक केली. इंडिगोपाठोपाठ एअरइंडिया कंपनपीने १.४७ कोटी प्रवाशांची वाहतूक केली असून कंपनीचा एकूण प्रवाशांमध्ये ९.७ टक्के वाटा आहे. त्याखालोखाल विस्तारा विमान कंपनीने १.३८ कोटी प्रवाशांची वाहतूक केली असून कंपनीचा एकूण प्रवाशात ९.१ टक्के वाटा आहे. त्याचप्रमाणे टाटा समूहातील उपकंपनी एआयएक्स कंपनीने १.०८ कोटी प्रवाशी वाहून नेले असून कंपनीचा एकूण प्रवासी संख्येत ७.२ टक्के वाटा आहे. त्याचप्रमाणे बजेट विमान कंपनी स्पाइसजेटने २०२३ साली ८३.९० लाख प्रवाशी वाहून नेले असून कंपनीचा बाजारातील वाटा ५.५ टक्के आहे. तसेच आकाशा एअर कंपनीने वर्षभरात ६२.३२ लाख प्रवाशी वाहून नेले असून कंपनीचा बाजारातील वाट ४.१ टक्के आहे अशी माहिती संचालनालयाच्या आकडेवारीतून दिसून आली आहे.

मात्र आकाशा विमान कंपनी देशात वेळेवर विमाने सोडण्यात पहिल्या क्रमांकावर आहे. या कंपनीची दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि बंगळुरू या शहरांत सेवा सुरू आहे. या कंपनीची ७२.७ टक्के विमाने अचूक वेळेवर सोडण्यात आली होती. याउलट सर्वाधिक तक्रारी स्पाइसजेट विमान कंपनीच्या विरोधात दाखल करण्यात आल्या आहेत. एकूण ८१२ तक्रारीपैकी ४२२ तक्रारी स्पाइसजेट विमान कंपनीविरोधात आहेत, अशी माहिती संचालनालयाच्या आकडेवारीतून मिळाली आहे.

logo
marathi.freepressjournal.in