८ वर्षाच्या मुलीने घेतला संन्यास; म्हणाली, 'ना कधी टीव्ही पहिला, ना कधी...'

वयाच्या ८व्या वर्षी एका मुलीने संन्यास, विशेष म्हणजे वडील आहे प्रसिद्ध कोट्याधीश हिरे व्यापारी
८ वर्षाच्या मुलीने घेतला संन्यास; म्हणाली, 'ना कधी टीव्ही पहिला, ना कधी...'

वय वर्षे ८ वे हे खेळण्या बागडण्याचे वय असते. अशा वयामध्ये कधी कोणी संन्यास घेतल्याचे ऐकले आहे का? ऐकून आश्चर्य वाटेल पण गुजरातमधील एका ८ वर्षाच्या मुलीने संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. या मुलीचे नाव देवांशी संघवी असे आहे. तिचे वडील धनेश संघवी हे प्रसिद्ध हिरे व्यापारी असून दोन मुलींमध्ये देवांशी त्यांची ज्येष्ठ कन्या आहे. तिला ३६७ दीक्षा कार्यक्रमात भाग घेतल्यानंतर तिला संन्यास घेण्याची प्रेरणा मिळाली.

देवांशी सर्वात मोठी मुलगी असल्याने ती कोट्यवधींची मालकीण बनू शकली असती. पण अवघ्या ८व्या वर्षीच तिने सगळ्या गोष्टींचा त्याग केला आहे. देवांशीचे वडील हे मोठे हिरे व्यावसायिक असून त्यांच्या जगभरात अनेक शहरांमध्ये कार्यालये आहेत. असे असतानाही देवांशीने संन्यास घेण्याचा निर्णय घेतल्याने सर्वच आश्चर्यचकित झाले. धनेश संघवी, त्यांची पत्नी अमी आणि त्यांचे दोन्ही मुली धार्मिक जीवनशैलीचे पालन करतात.

संघवी कुटुंबाजवळच्या मित्राने सांगितले की, "देवांशीने कधीही टीव्ही, सिनेमे पाहिलेले नाहीत. शिवाय, ती कधीही बाहेर हॉटेलला किंवा कोणत्या सोहळ्याला कधीही गेलेली नाही. विशेष म्हणजे तिने आत्तापर्यंत ३६७ दीक्षा कार्यक्रमांना हजेरी लावली. दरम्यान, दीक्षा घेण्यासाठी निवड होण्यापूर्वी तिने भिक्षुंसोबत ६०० किमीचा प्रवास केला. अनेक कठीण दिनचर्येनंतर तिला तिच्या गुरूंनी संन्यास घेण्याची परवानगी दिली. जैनाचार्य कीर्तिसुरीश्वरजी महाराज यांच्याकडून तिला दीक्षा दिली जाणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in