
नवी दिल्ली : सरकारने २०२२-२३ ला कर्मचारी भविष्य निर्वाह निधीसाठी ८.१५ टक्के व्याजदराला मंजुरी दिली आहे. कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (ईपीएफओ) मार्च २०२३ मध्ये ०.०५ टक्के व्याज वाढवण्याची शिफारस केली होती. एखाद्या कर्मचाऱ्याचे एक लाख रुपये जमा असल्यास त्याला ८१५० रुपये व्याज मिळेल. ईपीएफओने २४ जुलै रोजी आदेश काढला आहे.
देशातील ६ कोटी कर्मचारी याचे भागधारक आहेत. ईपीएफओ कायद्यांतर्गत मूळ वेतन व महागाई भत्त्याच्या १२ टक्के रक्कम पीएफ खात्यात जाते, तर कंपनीच्या १२ टक्के सहभागातील ३.६७ टक्के रक्कम पीएफ खात्यात, तर ८.३३ टक्के रक्कम ही पेन्शन स्कीममध्ये जाते.
२०२१-२२ मध्ये ईपीएफओने व्याजदर ८.१० टक्के ठेवला होता. हा व्याजदर गेल्या ४० वर्षांतील सर्वात कमी आहे.