राज्यसभेच्या १२ पैकी ९ जागा भाजपकडे

राज्यसभेच्या १२ जागांसाठीचे सगळेच्या सगळे १२ उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने निवडणूक घेण्याची गरज भासणार नाही.
राज्यसभेच्या १२ पैकी ९ जागा भाजपकडे
Published on

नवी दिल्ली : राज्यसभेच्या १२ जागांसाठीचे सगळेच्या सगळे १२ उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने निवडणूक घेण्याची गरज भासणार नाही. राज्यसभेच्या बिनविरोध झालेल्या या १२ जागांमध्ये भाजपचे ९, अजित पवार गट, काँग्रेस, राष्ट्रीय लोक मोर्चाच्या प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

भाजपचे ९ जण राज्यसभेवर निवडून गेले आहेत. महाराष्ट्रातून धैर्यशील पाटील, आसाममधून मिशन रंजन दास, रामेश्वर तेली, बिहारमधून मनन कुमार मिश्रा, हरयाणातून किरण चौधरी, मध्य प्रदेशातून जॉर्ज कुरियन, ओडिशातून ममता मोहंता, राजस्थानातून रवनीत सिंह बिट्टू, त्रिपुरातून राजीव भट्टाचार्जी यांची राज्यसभेवर वर्णी लागली आहे. अजित पवार गटाचे नितीन पाटील, काँग्रेसचे अभिषेक मनु सिंघवी, राष्ट्रीय लोक मोर्चाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाहदेखील बिनविरोध जिंकले आहेत. ९ राज्यांमधील १२ जागा रिक्त झाल्या होत्या. त्यात आसाम, बिहार, महाराष्ट्रातील प्रत्येकी २ जागा आणि हरयाणा, मध्य प्रदेश, राजस्थान, त्रिपुरा, तेलंगणा, ओडिशातील प्रत्येकी एका जागेचा समावेश होता.

logo
marathi.freepressjournal.in