टोमॅटो ७ रुपयांवर दरात ९० टक्के घसरण

टोमॅटोचे दर घाऊक बाजारात ७ ते ११ रुपये किलोपर्यंत घसरले आहेत
टोमॅटो ७ रुपयांवर दरात ९० टक्के घसरण

नवी मुंबई : गेल्या महिन्यात टोमॅटोचे दर किरकोळ बाजारात किलोला १८० रुपये रुपयांवर पोहचले होते. आता अवघ्या महिन्याभरात टोमॅटोचे दर घाऊक बाजारात ७ ते ११ रुपये किलोपर्यंत घसरले आहेत. टोमॅटोच्या दरात ९० टक्के घसरण झाली आहे.

गेल्या महिन्यात देशात टोमॅटोचा पुरवठा घसरला होता. त्यामुळे टोमॅटोचे दर किलोला २०० रुपयांपर्यंत पोहचले होते. त्यामुळे अनेक टोमॅटो उत्पादक कोट्यधीश झाले.

व्यापाऱ्यांनी सांगितले की, गेल्या आठवड्यात बाजारात १८०० क्विंटल टोमॅटो आले. त्यामुळे घाऊक बाजारात टोमॅटोच्या दरात घसरण झाली. सध्या किरकोळ बाजारात टोमॅटो २० ते ३० रुपये किलो दराने मिळत आहेत. गेल्या काही वर्षांत भाज्यांच्या दरात झालेली घसरण पाहिली नाही, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

सोमवारी एपीएमसीत ४ ट्रक व ४३ टेम्पो भरून टोमॅटो आले, तर जुलै व ऑगस्टमध्ये रोज ९ ते १० ट्रक टोमॅटो येत होते. टोमॅटोची वाढती मागणी लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर टोमॅटोची लागवड केली. आता टोमॅटोचे बंपर पीक आले आहे. आता शेतकऱ्यांच्या तोंडाला फेस आला आहे.

महाराष्ट्राच्या काही भागात शेतकऱ्यांना टोमॅटोला २ रुपये किलो दर मिळत आहे. ४ महिन्यांपूर्वीची परिस्थिती आली आहे. बंपर पीक आल्याने पुरवठा वाढल्याने दर घसरले आहेत, असे एका व्यापाऱ्याने सांगितले.

उलवे येथील रहिवासी सुहानी एस. यांनी सांगितले की, टोमॅटोचे दर कमी झाल्याने मी आनंदित आहे. गेले महिनाभर मी टोमॅटो विकत घेतले नव्हते. टोमॅटोऐवजी मी टोमॅटोचे केचअप वापरत होते.

logo
marathi.freepressjournal.in