मणिपूरमध्ये घुसले ९०० दहशतवादी, गनिमीकावा, ड्रोन युद्धात तरबेज; राज्याच्या सुरक्षा सल्लागारांचा गौप्यस्फोट

गेले दीड वर्ष हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये म्यानमारमधून ९०० दहशतवादी घुसले आहेत, असा गौप्यस्फोट राज्य सरकारचे सुरक्षा सल्लागार कुलदीप सिंह यांनी केला आहे.
मणिपूरमध्ये घुसले ९०० दहशतवादी, गनिमीकावा, ड्रोन युद्धात तरबेज; राज्याच्या सुरक्षा सल्लागारांचा गौप्यस्फोट
ANI
Published on

इम्फाळ : गेले दीड वर्ष हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये म्यानमारमधून ९०० दहशतवादी घुसले आहेत, असा गौप्यस्फोट राज्य सरकारचे सुरक्षा सल्लागार कुलदीप सिंह यांनी केला आहे. आपल्याला गुप्तचर यंत्रणांकडून याबाबतची माहिती मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

येथे झालेल्या पत्रकार परिषदेत कुलदीप सिंह म्हणाले की, म्यानमारमधून जंगल युद्ध व सशस्त्र ड्रोन वापरात तरबेज असलेले हे ९०० कुकी दहशतवादी - मणिपूरमध्ये घुसले आहेत. या

दहशतवाद्यांनी ड्रोनवर आधारित बॉम्ब, क्षेपणास्त्र, जंगल युद्धाचे प्रशिक्षण घेतले आहे. दक्षिण मणिपूरमध्ये भारत-म्यानमार सीमेला लागून असलेल्या सर्व जिल्ह्यांच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षकांना गुप्तचरांचा अहवाल पाठवला आहे. गुप्तचर यंत्रणांचा अहवाल १०० टक्के खरा आहे, असे मला वाटते. कोणतीही गुप्त माहिती ही १०० टक्के सत्य मानावी लागते. यासाठी आम्हाला तयार राहावे लागेल, असे ते म्हणाले.

गुप्तचर यंत्रणांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की, कुकी दहशतवाद्यांना ३०-३० च्या गटात विभागले असून ते वेगवेगळ्या भागात कार्यरत आहेत. या महिन्याअखेर ते मैतेईच्या गावांवर हल्ले करू शकतात.

कुलदीप सिंह पुढे म्हणाले की, सध्या म्यानमारच्या अनेक • प्रांतांमध्ये जातीय सशस्त्र संघर्ष सुरू आहे. यातील काही संघर्ष भारतीय सीमेच्या जवळ झालेले आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात अवैध नागरिकांचे लोंढे वाढल्याने दक्षिण मणिपूरमध्ये जातीय हिंसा वाढत आहे, असा आरोप मणिपूर सरकार अनेक दिवसांपासून करत आहे.

मणिपूरमध्ये १६ महिन्यांपासून सुरू असलेल्या संघर्षात २२० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे, तर ५० हजारांहून अधिक जण विस्थापित झाले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in