
इंफाळ : मणिपूरमध्ये गेल्या चार महिन्यात सुरू असलेल्या हिंसाचारात १७५ जणांचा बळी गेला आहे. त्यातील ९६ मृतदेह बेवारस आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
इंफाळ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत पोलीस महानिरीक्षक आय. के. मुईवा, पोलीस महानिरीक्षक जयंत कुमार (ॲॅडमिन), निशित उज्ज्वल (गुप्तचर) हे उपस्थित होते.
मणिपूरच्या हिंसाचारात १११८ जण जखमी झाले. त्यातील ३३ जण बेपत्ता आहेत. चार महिने सुरू असलेल्या हिंसाचारात ४७८६ घर, ३८६ धार्मिक स्थळांचे नुकसान झाले आहे, असे पोलिसांनी सांगितले.