
बानकुरा : ऑस्ट्रेलिया व भारत यांच्यातील विश्वचषक क्रिकेटच्या रविवारी अहमदाबाद येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाल्याने तो सहन न होऊन पश्चिम बंगालच्या बानकुरा जिल्ह्यात राहुल लोहार या २३ वर्षांच्या तरुणाने आपल्या राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली.
एका कपड्यांच्या दुकानात तो नोकरी करीत होता. रविवारी त्याने अंतिम सामना पाहण्यासाठी रजा घेतली होती. मात्र त्याने या पराभवाचा धक्का घेऊन फास लावून आत्महत्या केल्याची माहिती त्याचा मेहुणा उत्तम सूर याने दिली.
वास्तविक त्याच्या आयुष्यामध्ये तसे कोणतेही दु:ख नव्हते वा काही त्रासही नव्हता, असे उत्तमने सांगितले. त्याने आत्महत्या केली तेव्हा घरामध्ये कोणीही नव्हते. दरम्यान, पोलिसांनी राहुलचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी बानकुरा संमिलानी वैद्यकीय महाविद्यालयात पाठविला असून अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. नेमका मरणोत्तर तपासणी अहवाल अद्याप हाती आलेला नाही. चौकशी चालू असून अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला.