बेरोजगारीच्या आघाडीवर मोठी घसरण; जूनच्या तुलनेत दर कमी

शहरी भागातील बेरोजगारीचा दर मे महिन्याप्रमाणेच ८.२१ टक्के आहे. जूनमध्ये तो ७.३० टक्क्यांवर आला होता.
 बेरोजगारीच्या आघाडीवर मोठी घसरण; जूनच्या तुलनेत दर कमी

देशातील बेरोजगारीच्या आघाडीवर मोठी घसरण झाली आहे. जानेवारीतील ६.५६ टक्क्यांनंतर तो सहा महिन्यांतील नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. जुलैमध्ये तो ६.८० टक्के राहिला. जूनमध्ये देशात ७.८० टक्के बेरोजगारी वाढली होती. त्यामुळे जूनच्या तुलनेत बेरोजगारीचा दर एक टक्क्याने कमी झाला आहे. तथापि, शहरी भागातील बेरोजगारीचा दर मे महिन्याप्रमाणेच ८.२१ टक्के आहे. जूनमध्ये तो ७.३० टक्क्यांवर आला होता.

सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई) च्या आकडेवारीनुसार, जुलैमध्ये गावांमधील बेरोजगारीचा दर ६.१४ टक्के होता. जूनमध्ये तो ८.०३ टक्के होता. गावांमध्ये दर कमी होण्यामागचे कारण म्हणजे जुलै महिन्यात झालेला चांगला पाऊस. त्यामुळे खेड्यापाड्यातील लोकांना शेतात रोजगार मिळाला. सीएमआयईच्या म्हणण्यानुसार जूनमध्ये ३९ कोटी लोकांना रोजगार मिळाला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in