गंगा नदीत ५५ प्रवाशांना घेऊन जाणारी बोट बुडाली ; 10 प्रवासी बेपत्ता

या अपघातातील 45 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. अजूनही 10 प्रवासी बेपत्ता असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे
गंगा नदीत ५५ प्रवाशांना घेऊन जाणारी बोट बुडाली ;  10 प्रवासी बेपत्ता
Published on

बिहारची राजधानी पाटणाजवळील मणेर गावात एका बोटीला अपघात झाला आहे. शेरपूर घाटाजवळील गंगा नदीत ५५ प्रवाशांना घेऊन जाणारी बोट बुडाल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. या अपघातातील 45 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. अजूनही 10 प्रवासी बेपत्ता असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. एनडीआरएफ या बेपत्ता प्रवाशांचा शोध घेत आहे.

दानापूरचे एसडीएम घटनास्थळी हजर आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की 10 लोक बेपत्ता असून बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. बोटीवरील लोक दाऊदपूरचे रहिवासी आहेत. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, गंगा नदीच्या एका किनाऱ्यावरून तीन बोटीतून चारा कापून काही लोक आपापल्या घरी परतत होते. दरम्यान, नदीच्या जोरदार प्रवाहामुळे दोन बोटींची धडक झाली. बोटीवरील बहुतांश लोक दानापूर शाहपूर परिसरातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच आजूबाजूला मोठी गर्दी झाली होती. त्यानंतर शहापूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून जमाव हटवून शोध सुरू केला. संबंधित घटनेची माहिती अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in