मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या चंदिगढ येथील निवासस्थानाजवळ बॉम्ब सापडला

या परिसरात जिवंत बॉम्बचा शेल सापडला आहे. या घटनेनंतर पोलीस आणि बॉम्बशोधक पथक येथे दाखल झाले
मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या चंदिगढ येथील निवासस्थानाजवळ बॉम्ब सापडला
Published on

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या चंदिगढ येथील निवासस्थानाजवळ बॉम्ब शेल सापडला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बॉम्बशोधक पथक परिसरात दाखल झाले. ज्या ठिकाणी बॉम्ब शेल सापडला तो भाग पोलिसांनी सील केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी बॉम्ब शेल सापडला ते पंजाब आणि हरियाणा या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापासून जवळ आहे.

हा बॉम्ब शेल आंब्याच्या बागा असलेल्या परिसरात सापडला. पंजाब आणि हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांसाठी बांधलेल्या हेलिपॅडपासून हा परिसर 1 किमी आणि भगवंत मान यांच्या निवासस्थानापासून 2 किमी अंतरावर आहे.

या परिसरात जिवंत बॉम्बचा शेल सापडला आहे. या घटनेनंतर पोलीस आणि बॉम्बशोधक पथक येथे दाखल झाले. त्यांच्या मदतीने हा बॉम्ब निकामी करण्यात आला आहे. परिसराची नाकेबंदी करण्यात आली. चंदिगढमधील आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी संजीव कोहली म्हणाले की, येथे बॉम्बशेल कसा आला याचा शोध घेतला जात आहे आणि पुढील तपास सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in