Brij Bhushan Singh Case ; पॉक्सो प्रकरणी बृजभूषण यांना क्लीन चीट; क्लोजर रिपोर्ट दाखल

दिल्ली पोलिस कुस्ती परिषदेचे बृजभूषण यांच्याविरोधात आज आरोपपत्र दाखल करणार होते. मात्र...
Brij Bhushan Singh
Brij Bhushan SinghTwitter
Published on

दिल्ली पोलिसांनी भारतीय कुस्ती परिषदेचे खासदार ब्रिजभूषण सिंग ( Brij Bhushan Singh Case) यांच्यावर POCSO अंतर्गत दाखल केलेले आरोप रद्द करण्यासाठी कोर्टात याचिका केली. कोणतेही संबंधित पुरावे सापडले नसल्याने ही याचिका करण्यात आली. दिल्ली पोलिस कुस्ती परिषदेचे बृजभूषण यांच्याविरोधात आज आरोपपत्र दाखल करणार होते. मात्र सबळ पुराव्याअभावी गुन्ह्याचा तपास बंद करण्याची परवानगी त्यांनी कोर्टाकडे क्लोजर रिपोर्ट मागितल्याचे वृत्त आहे.

भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करत कुस्तीपटूंनी त्यांच्याविरोधात आंदोलन पुकारले होते. क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्या मध्यस्थीनंतर कुस्तीपटूंनी आपला विरोध मागे घेतला. त्यावेळी क्रीडामंत्र्यांनी कुस्तीपटूंना लवकरात लवकर तपास पूर्ण करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाची सूत्रे हलवण्यास सुरुवात केली होती. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी अनेक प्रकरणांचा तपास करून अखेर आज राऊस अॅव्हेन्यू कोर्टात क्लोजर रिपोर्ट दाखल केला.

या प्रकरणी गेल्या काही दिवसांपासून ऑलिम्पियन बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांच्या नेतृत्वाखाली जंतरमंतरवर आंदोलन सुरू आहे. बृजभूषण यांच्यावर कारवाई करून त्यांना तब्बल तीन एफआयआरमध्ये अटक करण्यात यावी, अशी कुस्तीगीरांची मागणी आहे. POCSO कायदा हा अल्पवयीन पीडितेवर अत्याचार करणाऱ्याला कठोर शिक्षा देणारा कायदा आहे. या कायद्यात जामिनाची तरतूद नाही. तथापि, दिल्ली पोलिसांनी POCSO कलमाखाली खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर दाखल केलेला खटला दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात रद्द करण्यात यावा, अशी विनंती केली, कारण या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यासाठी पुरेसे पुरावे नाहीत. या अर्जावर ४ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर, तपासादरम्यान आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्याइतपत सबळ पुरावा नसताना, पोलिसांकडून गुन्हा रद्द करण्यासाठी न्यायालयात अर्ज सादर केला जातो.

logo
marathi.freepressjournal.in