अमेरिकेत मालवाहू जहाजाच्या धडकेने पूल कोसळला

'दली' नावाचे हे जहाज सिनर्जी मरिन ग्रुपच्या मालकीचे आहे. हे जहाज बाल्टिमोर येथून कोलंबोकडे रवाना होत होते. दुर्घटनेच्यावेळी पुलावरून वाहतूक सुरू होती. त्यामुळे अनेक वाहने पाण्यात बुडाल्याची शक्यता आहे.मेरीलँड ट्रान्स्पोर्टेशन ऑथॉरिटी (एमटीए) यांनी सांगितले की, पूल कोसळल्याने सर्व वाहतूक बंद केली गेली आहे.
अमेरिकेत मालवाहू जहाजाच्या धडकेने पूल कोसळला

बाल्टिमोर : अमेरिकेतील बाल्टिमोरमध्ये एका मालवाहू जहाजाने मंगळवारी मध्यरात्री फ्रान्सिस स्कॉट की पुलास जोरदार धडक दिल्याने सदर पूल कोसळला व या पुलावरून जाणारी वाहने खालून वाहणाऱ्या नदीत कोसळल्याची घटना घडली. मदतकार्य पथक या दुर्घटनेत बुडालेल्या सात जणांचा शोध घेत आहे. दोन जणांना पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले असून त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.सदर मालवाहू जहाज मध्यरात्री या पुलावर आदळले, मात्र रात्रीच्या वेळी पुलावर वाहतूक कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली. जहाज पुलावर आदळल्यानंतर त्याने पेट घेतला आणि त्यामधून धुराचे लोट बाहेर पडताना दिसत होते.

'दली' नावाचे हे जहाज सिनर्जी मरिन ग्रुपच्या मालकीचे आहे. हे जहाज बाल्टिमोर येथून कोलंबोकडे रवाना होत होते. दुर्घटनेच्यावेळी पुलावरून वाहतूक सुरू होती. त्यामुळे अनेक वाहने पाण्यात बुडाल्याची शक्यता आहे.मेरीलँड ट्रान्स्पोर्टेशन ऑथॉरिटी (एमटीए) यांनी सांगितले की, पूल कोसळल्याने सर्व वाहतूक बंद केली गेली आहे. तसेच, या अपघातातील जखमींची माहिती अद्यापही समोर आलेली नाही. हा चारपदरी पूल पॅटापस्को नदीवर उभारण्यात आला आहे. बाल्टिमोर बंदरासाठी हा अत्यंत महत्त्वाचा पूल मानला जातो.

मालवाहू जहाजावरील सर्व खलाशी भारतीय

बाल्टिमोरमध्ये जे मालवाहू जहाज पुलावर आदळले, त्या जहाजावरील सर्वच्या सर्व म्हणजे २२ खलाशी भारतीय होते, असे सिनर्जी मरीन ग्रुपने एका निवेदनाद्वारे जाहीर केले आहे. सुदैवाने सर्वच्या सर्व खलाशी सुखरूप असून, त्यांना कोणतीही इजा झालेली नाही.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in