यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल

संसदेतील सुरक्षा व्यवस्था भेदण्याच्या संबंधात दिल्ली पोलिसांनी बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्यांतर्गत (यूएपीए) गुन्हा दाखल केला आहे.
यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल
PM

नवी दिल्ली : संसदेतील सुरक्षा व्यवस्था भेदण्याच्या संबंधात दिल्ली पोलिसांनी बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्यांतर्गत (यूएपीए) गुन्हा दाखल केला आहे.

या कायद्याच्या अंतर्गत असलेल्या कलम १६ दहशतवादी कृत्य, कलम १८ कारस्थान रचणे, भारतीय दंडविधान कलम १२० ब गुन्हेगारी कारस्थान, कलम ४५२ घुसखोरी, कलम १५३ दंगल घडवून आणण्याच्या उद्देशाने बेफाम चिथावणी देणे, कलम १८६ सरकारी कामात कर्मचाऱ्यांना अडथळा आणणे आणि कलम ३५३ लोकसेवकाला त्याच्या कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी हल्ला, अशी कलमे लागू करण्यात आली आहेत.

logo
marathi.freepressjournal.in