महिलेने उत्तेजक कपडे घातल्यास लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करता येणार नाही

महिलेने उत्तेजक कपडे घातल्यास लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करता येणार नाही

चंद्रन यांनी सादर केलेल्या छायाचित्रांवरून महिलेने उत्तेजक कपडे घातले होते, असे दिसून येते.

महिलेने उत्तेजक कपडे घातलेले असल्यास लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करता येणार नाही, असे निरीक्षण नोंदवत केरळच्या कोझिकोड येथील जिल्हा सत्र न्यायालयाने लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते सिविक चंद्रन यांना लैंगिक छळाच्या प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. सिविक चंद्रन यांनी जामीनअर्जासह तक्रारदार महिलेचे फोटोही कोर्टासमोर सादर केल्यानंतर न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले.

चंद्रन यांनी सादर केलेल्या छायाचित्रांवरून महिलेने उत्तेजक कपडे घातले होते, असे दिसून येते. त्यामुळे प्राथमिकदृष्ट्या भादंविच्या कलम ३५४ (अ) गुन्हा दाखल करता येणार नाही. भादंविच्या कलम ३५४ (अ) नुसार गुन्हा दाखल करायचा असेल तर महिलेचा विनयभंग करण्याची आरोपचा स्पष्ट उद्देश असायला हवा, असेही कोर्टाने म्हटले आहे.

दरम्यान, तक्रारदार महिला ही लेखिका असून तिने लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते सिविक चंद्रन यांच्यावर लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. फेब्रुवारी २०२०मध्ये नंदी बीचवर आयोजित एका शिबिरात चंद्रन यांनी आपला विनयभंग केला, असे महिलेने तक्रारीत म्हटले होते. महिलेच्या तक्रारीनंतर कोयलंडी पोलिसांनी भादंविच्या कलम ३५४ (अ) अंतर्गत चंद्रन यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in